आज आपल्या निर्माणकर्त्याचा पुरावा समोर असूनही, लोक त्याला नाकारतात हे सामान्य आहे.
कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत; अशासाठी की, त्यांना कसलीही सबब राहू नये. रोमकरांस पत्र १:२०
सृष्टीचा नीट अभ्यास केल्यास, निर्माणकर्त्याची जाणीव होईल.
आकाशगंगा, वनस्पतीची पाने, मानवी चेहरा आणि DNA—प्रथमदर्शनी ते असंबंधित वाटतात, पण जवळून पाहिल्यास, आपल्या लक्षात येते की त्या सर्वांमध्ये त्यांच्या निर्माणकर्त्याचा एकच नमुना, शैली आणि स्वाक्षरी आहे.
मग निर्माणकर्त्याचा नमुना काय आहे?
ते फिबोनाची क्रमाने संबंधित आहेत.
फिबोनाची क्रम निसर्गात आढळतो. ही एक अशी संख्या-शृंखला आहे, ज्यात प्रत्येक संख्या तिच्या आधीच्या दोन संख्यांची बेरीज असते.
सोप्या भाषेत सांगायचे तर, ०+१=१, १+१=२, २+१=३, २+३=५, ३+५=८ आणि असेच अनंतपर्यंत.
हे सुवर्ण गुणोत्तर म्हणून ओळखले जाते, याला दैवी प्रमाण असेही म्हटले जाते.
मालिकेमध्ये जसजशी संख्या मोठी होत जाते, तसतसे त्या सुवर्ण गुणोत्तराच्या जवळ जातात.
सुवर्ण गुणोत्तर संपूर्ण निसर्ग, मानव आणि आकाशगंगेमध्ये आढळते. जेव्हा आपण सृष्टीचा अभ्यास करतो, तेव्हा आपण स्पष्टपणे पाहतो की हा निर्माणकर्त्याचा नमुना आणि शैली आहे; ही निर्माणकर्त्याची स्वाक्षरी आहे.
“हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करण्यास तू योग्य आहेस; कारण तू सर्वकाही निर्माण केलेस, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.” प्रकटीकरण ४:११
याप्रमाणे, या पृथ्वीवर सर्व काही अपघाताने निर्माण झाले नाही.
निर्माणकर्त्याने इच्छेने सर्व काही निर्माण केले.
मग, आपल्या निर्माणकर्त्याची ओळख काय आहे?
उत्पत्ति १:२६ निर्माणकर्ता एलोहिम परमेश्वराबद्दल साक्ष आहे. मनुष्याला नर आणि नारी म्हणून परमेश्वराच्या प्रतिरूपात बनवले आहे, म्हणून निर्माणकर्ता परमेश्वर एक नाही, दोन आहेत.
ते आपले स्वर्गीय पिता आणि आपली स्वर्गीय माता आहेत. ते निर्माणकर्ता परमेश्वर आहेत ज्यांनी आपला नमुना ठेवला आहे. संपूर्ण सृष्टीमध्ये त्यांची स्वाक्षरी आहे. हे यासाठी केले आहे, की आपण आपल्या निर्माणकर्त्याला स्पष्टपणे पाहू शकू.
मला आशा आहे की जगातील सर्व लोक सृष्टीतील स्पष्ट चिन्हांद्वारे आपल्या निर्माणकर्त्याचा स्वीकार करतील आणि प्रेमाचा उगम असलेल्या आपल्या स्वर्गीय पिता एलोहिम आणि स्वर्गीय माता यांना प्राप्त करतील.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण