अब्राहामाने मलकीसदेकाला दशमांश दिला, ज्याने त्याला भाकर व द्राक्षरसाने आशीर्वाद दिला. आणि दावीदाने भविष्यवाणी केली की, “मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणें सार्वकालिक याजक परमेश्वर आहे.” तसेच, प्रेषित पौलाने “मलकीसदेकाला पिता व माता नाही किंवा वंशावळ नाही,” असे सांगून, मानवजातीच्या तारणासाठी पवित्र आत्म्याच्या युगात पुन्हा येणाऱ्या ख्रिस्ताविषयी साक्ष दिली.
जुन्या करारातील मलकीसदेकाने अब्राहामाला भाकर आणि द्राक्षरसाद्वारे शारीरिक आशीर्वाद दिला. त्याचप्रमाणे, येशूने नवीन कराराच्या वल्हांडणाच्या भाकर व द्राक्षरसाद्वारे पापांची क्षमा आणि अनंतकालिक जीवनाचा आशीर्वाद दिला.
ख्रिस्त आन सांग होंग यांनी १,६०० वर्षांपासून रद्द झालेला नवीन कराराचा वल्हांडण पुन्हा स्थापित करून साक्ष दिली की, तेच मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणें आलेले परमेश्वर आहेत.
कदार्लागोमर आणि त्याच्याबरोबरचे राजे यांस मारून तो माघारीं येत असतां . . . आणि शालेमाचा राजा मलकीसदेक भाकर व द्राक्षारस घेऊन त्यास सामोरा आला . . . तेव्हां अब्रामानें त्याला अवघ्याचा दहावा भाग दिला उत्पत्ती १४:१७–२०
मग येशूनें सांगितल्याप्रमाणें शिष्यांनीं जाऊन वल्हांडणाची तयारी केली. . . . येशूने भाकर घेऊन व आशीर्वाद देऊन . . . आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून . . . “हे माझे [नव्या] ‘कराराचे रक्त’ आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे.” मत्तय २६:१९–२८
सेनाधीश परमेश्वर . . . राखून ठेवलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करीत आहे . . . त्या दिवशी ते म्हणतील, “पाहा, हा आमचा देव! ह्याची आम्ही आशा धरून राहिलो; तो आमचे तारण करील.” यशया २५:६–९
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण