परमेश्वर लोकांची अंतःकरणे आणि मने आरपार पाहतात; त्यामुळे त्यांच्यापासून काहीही लपवता येत नाही. माणूस जीवनात जे काही करतो ते सर्व परमेश्वराच्या न्यायासनासमोर नक्कीच प्रकट होईल आणि प्रत्येकाचा त्याच्या कृत्यांप्रमाणे न्याय केला जाईल. म्हणून बायबल म्हणते, “आपल्या प्रवासाच्या काळात भिऊनच वागा.”
“तुम्ही या सर्वांत लहानांपैकी एकासाठी जे काही केले, ते माझ्यासाठी केले,” असे सांगणारे ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांच्या शिकवणीनुसार, चर्च ऑफ गॉडचे सदस्य नम्रपणे एकमेकांची सेवा करतात आणि प्रेम आचरणात आणतात. याशिवाय, इस्राएल लोकांच्या कुरकुर व तक्रारींमुळे आणि याजकाची मुले हफनी व फिनहास यांच्या अनैतिकतेमुळे आलेल्या आपत्तीपासून धडा घेऊन, ते नेहमी विश्वासपूर्ण पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करतात.
कारण असा शास्त्रलेख आहे की, “तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.” जो तोंडदेखला न्याय करत नाही, तर ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे न्याय करतो त्याला जर तुम्ही ‘पिता म्हणून हाक मारता,’ तर आपल्या प्रवासाच्या काळात भिऊनच वागा. १ पेत्र १:१६–१७
आता सर्वकाही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे. सगळ्या बर्यावाईट गुप्त गोष्टींचा न्याय करताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल. उपदेशक १२:१३–१४
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण