गिदोन आपल्या घराण्यामध्ये सर्वात कनिष्ठ होता, जो इस्त्राएलाच्या सर्व कुळांमधून सर्वात क्षुद्र कुळातला होता.
तरीही तो परमेश्वराच्या वचनाचे पालन करुन फक्त ३०० सैनिकांच्या बरोबर
१,३५,००० मिद्यानी पुरुषांना हरवण्यामध्ये सक्षम होता. मोशे व यहोशवाने देखील
परमेश्वराच्या वचनाचे पालन करुन अमालेकांच्या विरुध्द युध्द जिंकले.
त्याचप्रमाणें, आज देखील, सर्व परिस्थितींमध्ये विजय परमेश्वराच्या सहाय्यावर
विश्वास करुन आणि त्यांची आज्ञा पाळल्याने मिळतो.
जसे यशयाने भविष्यवाणी केली होती, “परमेश्वर, जो सर्वात लहान त्याचे सहस्त्र बनवतील,”
ते ज्यांना ह्याची जाणीव होते की या पृथ्वीवर सर्वकाही परमेश्वराच्या योजनेनुसार
पूर्ण केले जात आहे, आणि परमेश्वराच्या वचनाचे पालन करतात,
येथंवर की त्या वचनाचे पण जे सामान्य दिसते, ते आशीर्वादित होतील.
तो त्याला म्हणाला, प्रभो… माझें कुळ मनश्शेवंशात सर्वात दरिद्री आहे;
तसाच मी आपल्या वडिलांच्या घराण्यात, अगदिं कनिष्ठ आहे.
परमेश्वर त्याला म्हणाला, खरोखर मी तुझ्याबरोबर असेन;
जसे एका माणसाला मारावें तसें एकजात सार्या मिद्यानाला तूं मारशील.
शास्ते ६:१५-१६
तुझे सर्व लोक धार्मिक होतील, ते भूमीचे वतन सर्वकाळ भोगतील;
माझे गौरव व्हावें म्हणून ते माझे लाविलेले रोप होतील,
जो सर्वात लहान त्याचे सहस्त्र होतील, जो क्षुद्र त्याचें बलाढ्य राष्ट्र होईल;
मी परमेश्वर हें योग्य समयीं त्वरित घडवून आणीन.
यशया ६०:२१-२२
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण