राजा आसा आणि राजा यहोशाफाट यांनी परमेश्वराचे नियम आणि कायदे विश्वासूपणे पाळले, प्रत्येक मूर्तीचा नाश केला आणि जोपर्यंत परमेश्वर त्यांच्यासोबत आहे तोपर्यंत सर्व काही चांगले होईल या अतूट विश्वासाने आपल्या लोकांवर आणि राज्यांवर राज्य केले. परिणामी, परमेश्वराने त्यांच्या राष्ट्राला शांती दिली आणि त्यांना भरभरून आशीर्वाद व गौरव प्रदान केला.
बायबलमध्ये नोंदवलेल्या इतिहासाद्वारे, परमेश्वराने मानवजातीला त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा मार्ग दाखवला आहे. जसे आसाने त्याच्या नंतरच्या काळात केले, तसे आपण परमेश्वराला शोधण्यात अयशस्वी होऊन मदतीसाठी शक्तिशाली राष्ट्रांकडे वळण्याचे पाप करू नये. तसेच, जसे यहोशाफाटने केले, तसे आपण वाईट कृत्ये करणाऱ्यांसोबत किंवा त्यांच्यासोबत कोणताही प्रयत्न करणाऱ्यांसोबत जुळवून घेऊ नये. कारण जेव्हा आपण परमेश्वराला विसरतो आणि आपल्या सभोवतालच्या लोकांवर आणि परिस्थितीवर विश्वास ठेवतो, तेव्हा ते आपले आशीर्वाद काढून घेतात.
आसाच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षाच्या तिसर्या महिन्यात ते यरुशलेमेत एकत्र झाले. त्यांनी आणलेल्या लुटीतून सातशे बैल व सात हजार शेरडेमेंढरे त्या दिवशी परमेश्वराला अर्पण केली. त्यांनी असा करार केला की आम्ही जिवेभावे आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याला शरण जाऊ; सर्व यहूदी लोक आणभाक करून हर्षभरित झाले; त्यांनी मनःपूर्वक शपथ वाहिली, ते मोठ्या उत्कंठेने त्याला शरण गेले आणि तो त्यांना पावला; परमेश्वराने त्यांना चोहोकडून स्वास्थ्य दिले. २ इतिहास १५:१०–१५
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण