संपूर्ण जग ख्रिसमस (२५डिसेंबर) रोजी येशूचा जन्म साजरा करते.
मात्र, येशूची जन्मतारीख बायबलमध्ये नाही.
फक्त असे म्हटलेले आहे की, मेंढपाळ, जे रानात आपल्या कळपाची राखण करत होते, त्यांनी येशूची स्तुती केली. (लूक २:८)
कडाक्याच्या थंडीत, रानामध्ये कळपावर लक्ष ठेवणे शक्य नाही.
येशूचा जन्म खरोखरच २५ डिसेंबरला झाला होता का?
सुरुवातीच्या ख्रिस्ती लोकांनी येशूचा जन्मदिवस पाळला नाही.
मग, ख्रिसमसची सुरुवात कोठून झाली?
२५ डिसेंबर, ख्रिसमस . . .
“२५ डिसेंबर हा येशूचा जन्मदिवस नाही, तर सूर्य-देवाचा आहे.
ख्रिसमसची सुरुवात अजिंक्य सूर्यासाठी असलेल्या मूर्तिपूजक उत्सवातून झाली आहे.” [ब्रिटानिका विश्वकोश]
‘काय? ख्रिसमसची सुरुवात मूर्तिपूजक सणातून झाली?’
“प्राचीन रोममध्ये सटर्नालिया नावाचा सण होता, जो १७ डिसेंबर ते २४ डिसेंबर या कालावधीत पाळला जात असे. या सणादरम्यान, लोक श्रीमंत व गरीब असा फरक विसरुन भोग-विलासात मग्न राहत असत.” [ख्रिस्ती चर्चचा इतिहास]
“२५ डिसेंबर, हा सूर्यदेव मिथ्राचा जन्मदिवस होता, ज्या वेळेपासून दिवस मोठा होऊ लागतो.” [ब्रिटानिका विश्वकोश]
‘नाही! असे कसे असू शकते!!!’ २५ डिसेंबर, ख्रिसमस हा येशूचा जन्मदिवस नाही!!!
रोमन कॅथोलिक चर्चने, ‘सुर्यदेव, मिथ्रा’ याच्यावरील विश्वासाला तोडण्याच्या बहाण्याने, “सूर्यदेवाचा जन्मदिवस”
येशूच्या जन्मदिवसामध्ये बदलला. [सोन्याची शाखा - जेम्स जी. फ्रेझर]
ख्रिसमस ट्री, मूर्तिपूजक लोकांच्या वृक्षपूजेतून सुरु झाला. [ब्रिटानिका विश्वकोश]
लाल झगा आणि पांढर्या दाढीसह, सांताक्लॉजची प्रतिमा १९३१ मध्ये कोका-कोलाच्या जाहिरातीसाठी तयार केलेली होती. [हॅडन संडब्लॉम द्वारे चित्रित]
ख्रिसमस हा येशूचा जम्सदिवस नाही हे चर्चला चांगल्या प्रकारे माहित आहे.
तरी देखील, ते अजूनही खोटे बोलत आहेत की ख्रिसमस हा येशूचा जन्मदिवस आहे.
ख्रिस्ती, या वस्तुस्थितीशी पूर्णपणे अपरिचीत व अजाण आहेत.
“इ.स ३५४ नंतर, २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा करण्यात आला.” [जागतिक पुस्तक विश्वकोश]
इ.स ३५४ नंतर? येशूच्या शिष्यांनी आणि प्रेषितांनी कधीही ख्रिसमस पाळला नाही!
“ख्रिसमस परमेश्वराने स्थापलेला नाही, आणि तो बायबलवरही आधारित नाही.” [बायबलसंबंधी, धर्मशास्त्रीय आणि चर्चच्या साहित्याचा विश्वकोश]
त्यांनी सूर्यदेवाच्या जन्मदिवसाला येशूच्या जन्मदिवसामध्ये बदलले!
हे खरच फार भयंकर आहे!
बायबल म्हणते की, जर मनुष्यांच्या आज्ञा पाळल्या, तर परमेश्वराची उपासना करणे व्यर्थ आहे. (मत्त १५:९)
बायबलमध्ये अनेक वेळा लिहिले आहे की, मूर्तिपूजक प्रथांचे पालन केल्याने इस्राएल लोकांचा कसा नाश झाला! (यहे ११:८-१२)
सीनायच्या रानात, मूर्तीची पूजा करताना त्यांना वाटले की, ते परमेश्वराची उपासना करत आहेत. (निर्ग ३२:१-६)
उत्तर इस्राएलच्या यराबाम राजाने देखील परमेश्वराची उपासना करण्याचा दावा करून आपल्या मनाने एक दिवस निवडून सण पाळला. (१ राजे १२:२५-३३)
मात्र, ज्यांनी मूर्तिपूजा केली होती ते सर्व नष्ट झाले.
त्याचप्रमाणे, जरी ते ख्रिसमसच्या दिवशी येशूची उपासना करण्याचा दावा करत असले, तरी ती फक्त मूर्तिपूजा आहे.
मूर्तिपूजेचा शेवट नाश आहे.
दुसर्यांदा आलेले ख्रिस्त आन सांग होंग जी द्वारे स्थापित चर्च ऑफ गॉड, बायबलमध्ये नसलेला ख्रिसमस, सूर्य-देवाचा जन्मदिवस साजरा करत नाही.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण