नरक एक अतिशय भयंकर ठिकाण आहे जेथे अग्नीच्या
यातनेमध्ये पाण्याचा एक थेंब देखील प्राप्त करणे कठीण आहे.
(लूक १६:२४)
येशूने म्हटले की, जर आपला हात,
पाय किंवा डोळा आपल्याला पापास प्रवृत्त करत असेल,
तर ते तोडून टाकणे हे नरकात जाण्यापेक्षा उत्तम आहे .”
(मार्क ९:४३)
असे यामुळे आहे कारण की नरकातल्या यातनेची तुलना,
आपल्या शरीराचा एक अवयव कापण्याच्या
यातने बरोबर केली जाऊ शकत नाही.
जेथे त्यांचा किडा मरत नाहीं
व अग्नि विझत नाहीं
(मार्क ९:४८)
कारण प्रत्येक मनुष्य अग्नीनें
शुध्द केला जाईल.
(मार्क ९:४९)
जरी नरकाची शिक्षा अत्यंत वेदनादायक आहे,
तरी आपण स्वत:हून मरू शकत नाही.
नरकामध्ये, आयुष्याच्या आनंदाचा क्षण नाही,
विश्रांतीचा क्षणही नाही
आणि तारणाची अजिबात आशा नाही,
पण फक्त प्रचंड वेदना, खेद आणि दु:ख आहे.
जर आपण सुवार्ता ऐकल्यानंतर पश्चात्ताप केला नाही
तर आपल्याला नरकात का जावे लागते?
या पृथ्वीवर जन्म घेण्यापूर्वी,
आपण स्वर्गामध्ये देवदूत होतो.
(ईयोब ३८:४)
पण, आपण स्वर्गामध्ये पाप केले आणि
आपल्याला नरकात जाण्याची शिक्षा ऐकविण्यात आली.
म्हणून, आपण एका आत्मिक तुरुंगात, पृथ्वीवर जन्मास आलो आहोत,
आणि आपण येथे तात्पुरत्या स्वरुपात राहतो.
(यहेज्केल २८:१३)
जर आपण या पृथ्वीवर नरकाच्या शिक्षेपासून
वाचण्याचा मार्ग शोधला नाही, तर आपले नरकात जाणे नक्की आहे.
किती मी कष्टी माणूस!
मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील?
(रोमकरांस पत्र ७:२४)
परमेश्वराने नरकाची शिक्षा प्राप्त करण्यासाठी
ठरलेल्या मानवजातीवर दया केली
आणि नरकाच्या शिक्षेपासून वाचण्याचा मार्ग
दाखविण्यासाठी ते स्वत: या पृथ्वीवर आले.
“मी ... पापी लोकांस पश्चात्तापासाठी
बोलावण्यास आलों आहे.”
(लूक ५:३२)
मृत्युकडे घेऊन जाणार्या आपल्या पापांची क्षमा करण्यासाठी
आणि आपल्याला नरकाच्या शिक्षेपासून वाचविण्यासाठी,
परमेश्वराने मानवजातीसाठी म्हणजेच पापी लोकांसाठी
खंडणी म्हणून आपले मांस आणि रक्त दिले.
“घ्या, खा, हे माझे शरीर आहे.”
हा वल्हांडणाचा द्राक्षरस माझे [नव्या] ‘कराराचे रक्त’ आहे.
हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे.
(मत्तय २६:२८)
जेव्हां आपण नवीन कराराचा वल्हांडण पाळतो,
तेव्हां आपल्याला पापांच्या क्षमेचा आशीर्वाद प्राप्त होतो
आणि आपण नरकाच्या शिक्षेपासून वाचवले जातो.
आणि तसेच, आपण सार्वकालिक जीवन प्राप्त करुन
परत स्वर्गात जाऊ शकतो.
जो माझा देह खातो व माझें रक्त पितो,
त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे;
आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन.
(योहान ६:५४)
पण, जर आपण या संदेशाला नाकारले की,
“वल्हांडणाद्वारे पापांची क्षमा आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करा”
तर स्वर्गामध्ये केलेल्या आपल्या पापांची क्षमा केली जाऊ शकत नाही,
आणि आपल्याला ठरल्याप्रमाणे नरकाची शिक्षा भोगावी लागेल.
“मीं दुःख भोगण्यापूर्वी हें वल्हांडणाचें भोजन तुम्हांबरोबर
करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती;”
(लूक २२:१५)
कृपया पापांच्या क्षमेसाठी परमेश्वराचे चिन्ह,
नवीन कराराचा वल्हांडण पालन करा, आणि स्वर्गात परत जा!
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण