जेव्हा परमेश्वराने गिदोनाच्या सैन्याची निवड केली तेव्हा त्यांनी त्या लोकांना अस्वीकार केले जे घाबरत होते. त्यांनी यहोशवाच्या सैन्याला न घाबरण्याचा नेहमी आग्रह धरला. याद्वारे, आपण पाहू शकतो की, परमेश्वराच्या अभिवचनांवर विश्वास ठेवणे आणि धाडसाने पुढे जाणे सर्वात महत्वाची बाब आहे.
जसे इस्त्राएल लोक ज्यांनी परमेश्वराच्या अभिवचनांवर विश्वास ठेवला नाही, वाईट बातमी पसरवली आणि कनानबद्दल तक्रार केली त्याचप्रमाणे, जर आपण लोकांना आणि वातावरणाला घाबरतो, तर आपण कधीच आध्यात्मिक कनान, स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकणार नाही. जेव्हा आपण त्या अभिवचनावर विश्वास ठेऊन, जे ख्रिस्त आन सांग होंग आणि मता परमेश्वर ह्यांनी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी दिले आहे, धाडसाने स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता प्रचार करतो, तेव्हां सुवार्तेचे आश्चर्यजनक कार्य होईल जे संपूर्ण जगाला आश्चर्यचकीत करेल.
नियमशास्त्राचा हा ग्रंथ पुस्तक तुझ्या मुखीं सदैव असू दे; त्यांत जे कांहीं लिहिलें आहे तें तूं काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचें मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश:प्राप्ति घडेल.मी तुला आज्ञा केली आहे ना? खंबीर हो, हिंमत धर, घाबरु नको, कचरु नको; कारण तूं जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्यबरोबर असेल.
यहोशवा १:८-९
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण