आपण कोठून आहोत? मेल्यानंतर आपण कोठे जाणार? जरी अनेक तत्वज्ञानी, धर्मशास्त्रज्ञ आणि शास्त्रज्ञ यांनी शतकांपासून जीवनाचे सार शोधण्यासाठी अभ्यास केला आहे, परंतु विरोधाभासांशिवाय सिद्धांताची अचूक प्रणाली सादर करण्यात ते सक्षम झाले नाहीत. जीवनाचा सार न समजता लोक भटकत आहेत आपल्या नोकरीतमध्ये अडकून आहेत आणि मृत्यूला सामना करत आहेत.
ज्याप्रमाणे वार्याने उडून पाने गळतात, त्याचप्रमाणे आपले जीवन गळालेल्या पानांसारखे एक पोकळ स्वप्न आहे. मात्र, आपल्या जीवनामध्ये काहीतरी महत्त्वाचे दडलेले आहे.
बायबल शिकवते की मृत्यूचा अर्थ आहे स्वर्गात “परत जाणे”. (उप १२:७)
“परत जाणे” म्हणजे त्या ठिकाणी जाणे जेथून तुम्ही आले आहात.
परमेश्वराने पृथ्वी निर्माण करण्यापूर्वी, तुम्ही स्वर्गात होतात.
“हे ईयोब, मी पृथ्वी निर्माण केली तेव्हा तू कोठे होतास? तू स्वर्गात होतास आणि तू बहुत दिवसांचा म्हणायचा!” ईयोब ३८:१-२१
परमेश्वराने ईयोबाला शिकवले की, पृथ्वीवर जन्माला येण्यापूर्वी, तो स्वर्गात होता.
ईयोबप्रमाणेच, आपण देखील पृथ्वीवर जन्म घेण्यापूर्वी स्वर्गामध्ये होतो.
आपण पृथ्वीवर राहत असताना, आपले शरीर एक “तंबू” आहे जेथे आपला आत्मा काही काळासाठी निवास करतो. (२ करिं ५:१)
म्हणून, येशूद्वारे शिकवण्यात आलेल्या प्रेषितांनी मानवजातीला “परके” आणि “प्रवासी” म्हटले.
त्यांना माहित होते की आपला सवदेश “स्वर्ग” आहे. (इब्री ११:१३)
स्वर्गामध्ये, जेथे आपण पाप केले, काळ, ठिकाण आणि वेगाची कोणतीच मर्यादा नाही.
मनुष्यजाती स्वर्गातील आठवणींना गमावून पृथ्वीवर टाकण्यात आले.
पापांच्या दु:खाने कण्हून, लोक सर्व प्रकारच्या नाशांच्या भीतीने थरथर कापत आहेत.
तुम्हाला आपल्या सुंदर आणि वैभवशाली घराची आठवण येत नाही का?
आपल्या गौरवशाली स्वर्गीय घरी परत जाण्याचा काही मार्ग नाही का?
जेव्हा आपल्याला उत्तर मिळेल तेव्हाच आपण परत जाऊ शकतो.
२,००० वर्षांपूर्वी, येशू आले आणि आपल्याला शिकवले की आपण स्वर्गामध्ये केलेल्या पापांची क्षमा कशी प्राप्त करु शकतो आणि स्वर्गाच्या राज्याचा मार्ग उघडला. (मत्त २६:२६)
या युगामध्ये, आत्मा आणि वधूने हरवलेल्या वल्हांडणाला पुनर्स्थापित केले आणि आपले मार्गदर्शन आपल्या सार्वकालिक घरी, स्वर्गाकडे केले.मला आशा आहे की तुम्ही पुनर्स्थापित केलेला वल्हांडण पाळाल आणि आपल्या स्वर्गीय घरी परत जाल ज्याची तुम्ही आठवण काढता. आम्ही तुम्हाला आपल्या सार्वकालिक घरी, स्वर्गामध्ये आमंत्रित करतो.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण