परमेश्वराने ते नाश आणले नाहीत जे त्यांनी निनवेवर आणण्याचा निर्णय घेतला होता कारण की, लोकांनी प्रामाणिकपणे पश्चात्ताप केला होता, जरी त्यांनी इतर देवांचे पालन केले होते व इस्त्राएलला त्रास दिला होता.
जेव्हा उजवी कडील चोर आणि उधळ्या पुत्र, ज्याने आपल्या वडिलांना सोडून दिले होते, त्यांनी पश्चात्ताप केला तेव्हा त्यांना आशीर्वाद मिळाले.
या सर्वांद्वारे, परमेश्वराने मानवजातीला दाखवले की, जेव्हा ते आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप करतात तेव्हा ते नाशापासून वाचू शकतात.
हट्टी आणि पश्चात्ताप न करणारे अंत:करण न्यायाच्या दिवसासाठी परमेश्वराचा क्रोध साठवित आहे.
चर्च ऑफ गॉडच्या सदस्यांना ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर यांच्या वचनांच्या माध्यमातून संपूर्ण पश्चात्तापाचा मार्ग समजला, आणि ते अशी आशा करुन की, इतर लोकं देखील पश्चात्तापाद्वारे वाचवले जातील, आता नवीन कराराच्या सुवार्तेचा प्रचार करत आहेत.
“प्रभु परमेश्वर म्हणतो, हे इस्त्राएल घराण्या, यास्तव मी तुम्हा प्रत्येकाचा ज्याच्या त्याच्या मार्गाप्रमाणें न्याय करीन. तुम्ही परता, आपल्या सर्व पातकांपासून मागें फिरा, म्हणजे तुमचा अधर्म तुम्हांस अडथळा होणार नाहीं.”
यहेज्केल १८:३०
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण