इस्त्राएल लोकांनी त्यांच्या मूर्तिपूजेचा पश्चात्ताप केल्यानंतर दहा आज्ञांच्या दुसर्या पाट्या प्राप्त केल्या आणि परमेश्वराने त्या दिवसाला प्रायश्चित्ताचा दिवस असे नाव दिले कारण की त्यांना परमेश्वराकडून प्रायश्चित्त मिळाले होते.
पवित्र दिनदर्शिकेनुसार सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी रणशिंगे फुंकण्याचा सण, तो सण आहे जेव्हां पश्चात्तापाचे रणशिंग याचा इशारा देण्यासाठी फुंकण्यात आले होते की सर्व लोकांनी परमेश्वराकडे पश्चात्ताप केला पाहिजे कारण दहा दिवसांनंतर प्रायश्चित्ताचा दिवस आहे.
ज्याप्रमाणे इस्त्राएल लोकांनी मोशेच्या काळात प्रायश्चित्त दिवसाच्या दहा दिवस अगोदर पश्चात्तापाचे रणशिंग फुंकले, त्याचप्रमाणे आता आपण रणशिंग फुंकून सर्व जगाला ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांच्याकडे येण्याचे आवाहन केले पाहिजे म्हणजे ते वाचवले जातील आणि बाप्तिस्मा आणि नवीन कराराच्या सणांद्वारे संपूर्ण पश्चात्ताप करतील.
“इस्राएल लोकांना सांग : सातव्या महिन्याची प्रतिपदा तुम्हांला परमविश्रामाची असावी; स्मरण देण्यासाठी त्या दिवशी रणशिंगे फुंकावीत व पवित्र मेळा भरवावा.”
लेवीय २३:२४–२५
येशूने त्यांना उत्तर दिले, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते.
मी नीतिमानांना बोलवायला आलो नाही तर पापी लोकांना पश्चात्तापासाठी बोलवायला आलो आहे.”
लूक ५:३१–३२
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण