काही लोक बायबलला फक्त इस्त्राएलच्या इतिहासाचे किंवा पौराणिक कथांचे पुस्तक समजतात.
पण, बायबल हे जगातील सर्वात जुने पुस्तक आहे, जे वेग-वेगळ्या वेळेस विविध व्यवसायातील आणि वयोगटातील डझनभर लोकांद्वारे सुमारे १६०० वर्षांच्या कालावधीत लिहिण्यात आले आहे. यापेक्षाही जास्त आश्चर्याची गोष्ट ही आहे की, १६०० वर्षांमध्ये लिहिण्यात आलेली प्रत्येक गोष्ट भविष्यवाणी आणि पूर्णता या रूपात जोडलेली आहे.
बायबलच्या नोंदीमधून, या आपण कोरेश राजाविषयी भविष्यवाणी आणि त्याची पूर्णता याचा अभ्यास करुया.
कोरेश राजा पारस साम्राज्याचा संस्थापक आणि पूर्वेकडील देशाचा विजेता होता.
या आपण बायबलमध्ये नोंद केलेल्या त्याच्या महान कामगिरीकडे पाहूया.
पारसचा राजा कोरेश असें म्हणतो, “स्वर्गीचा देव परमेश्वर यानें पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिलीं असून अशी आज्ञा केली आहे कीं यहूदा प्रांतातील यरुशलेमेंत माझ्याप्रीत्यर्थ एक मंदिर बांध; . . .” एज्रा १:२
पारसचा राजा कोरेश याने इस्त्राएलच्या परमेश्वराची स्तुती का केली आणि इस्राएल लोकांना का मुक्त केले? कोरेश राजाने आपले नाव यशयाच्या पुस्तकामध्ये लिहिलेले पाहिले, जे इस्राएल लोकांना मुक्त करण्याच्या सुमारे १७० वर्षांपूर्वी लिहिण्यात आले होते.
परमेश्वर म्हणतो, कोरेश माझा अभिषिक्त आहे; त्याच्यापुढें राष्ट्रें पादाक्रांत करण्यासाठीं मीं त्याचा उजवा हात धरिला आहे; . . . यश ४५:१-३
तुला अंधारांतील निधि व गुप्त स्थळीं लपविलेलें धन दईन, म्हणजे तुला समजेल कीं तुला तुझ्या नांवानें हाक मारणारा मी परमेश्वर इस्त्राएलाचा देव आहें. यश ४५:१-३
कोरेश राजाला जाणीव झाली की, परमेश्वराने त्याला बाबेल राष्ट्राचा पराभव करण्यास मदत केली होती, आणि त्याने बायबलमधील भविष्यवाणी नुसार इस्त्राएल लोकांना मुक्त केले.
परिणाम स्वरुपात, कोरेश राजाची आज देखील लोकांद्वारे एका प्राचीन सम्राटाच्या रुपाने प्रशंसा केली जाते ज्याने गुलामांना मुक्त केले आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराला मान्यता दिली.
बायबलने, येशू पृथ्वीवर येण्याच्या सुमारे ७०० वर्षांपूर्वी एका बाळाच्या रूपात येशूच्या जन्माची देखील भविष्यवाणी केली होती.
“. . . पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचें नांव इम्मानुएल (आमच्यासन्निध देव) असें ठेवील.” यश ७:१४
या भविष्यवाणीनुसार, कुमारी मरीयेच्या शरीराद्वारे परमेश्वराचा जन्म येशूच्या रुपात झाला होता. (मत्त. १:१८-२३) याशिवाय, बायबलने विस्तारीतपणे भविष्यवाणी केली की, येशूला कसे त्रास सहन करावे लागतील.
“तुच्छ मानिलेला, मनुष्यांनीं टाकिलेला, . . . खरें पाहिलें असतां तो आमच्या अपराधांमुळें घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळें ठेचला गेला; आम्हांस शांति देणारी अशी शिक्षा त्यास झाली; त्यास बसलेल्या फटक्यांनीं आम्हास आरोग्य प्राप्त झालें.” यश. ५३:३-५
या भविष्यवाणीनुसार, येशूला भाला भोसकण्यात आला आणि फटके मारण्यात आले (मत्त. २७:२६-३५; योहा. १९:३४). जरी बायबलच्या भविष्यवाण्या लिहिण्यात आलेल्या वेळेस लोकांद्वारे समजण्यात आल्या नव्हत्या, पण त्या सर्व पूर्ण झालेल्या आहेत.
म्हणून बायबल आपल्याला इशारा देते की, आपण संदेशाचा धिक्कार केला नाही पाहिजे. (१ थेस्स. ५:२०) असे यामुळे आहे कारण की जर आपण बायबलच्या भविष्यवाण्यांकडे दुर्लक्ष केले तर आपले तारण होऊ शकत नाही. जसे की भविष्यवाण्या जशा लिहिण्यात आल्या होत्या अगदी तशाच पूर्ण झाल्या, म्हणून ज्या भविष्यवाण्या बाकी आहेत त्या सर्व न चुकता पूर्ण होतील.
मोठेमोठे भूमिकंप होतील, जागोजाग मर्या येतील व दुष्काळ पडतील, आणि भयंकर उत्पात व आकाशांत मोठीं चिन्हें घडून येतील; लूक २१:११
बायबल आपल्याला सांगते की, शेवटचा मोठा नाश आणि अनर्थ येण्याआधी आपण वाचवले जाण्यासाठी सियोनमध्ये पळाले पाहिजे.
“... सीयोनेच्या दिशेकडे ध्वजा उभारा; आश्रयासाठीं पळा, थांबूं नका, कारण मी उत्तरेकडून अरिष्ट, मोठा नाश, आणीत आहे.” यिर्म. ४:५-६
सियोन, जेथें परमेश्वराचे सण पालन केले जातात, हे आश्रय आणि तारणाचे ठिकाण आहे ज्याचे परमेश्वराने आपल्याला अभीवचन दिले आहे (यश ३३:२०). वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड हे जगातील एकमेव चर्च आहे जे बायबलच्या शिकवणीनुसार परमेश्वराचे सण पालन करते; ते सियोन आहे.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण