एकट्या एलीयाने ८५० खोटे संदेष्टे यांच्याविरुद्ध लढा दिला; तरुण दावीदाने महाकाय गल्याथाचा पराभव केला; गिदोनाचे ३०० योद्धे १,३५,००० मिद्यानी सैन्याशी लढले; इस्राएल लोकांनी वाळवंटात ४० वर्षे दु:ख सहन केले आणि सुरुवातीच्या मंडळीच्या संतांनी छळ आणि हौतात्म्य पत्करून सुवार्तेचा प्रचार केला. संकटाच्या वेळी, त्यांची अंतःकरणे शुद्ध झाली, आणि त्यांचा विश्वास परमेश्वराने स्वीकारला; शेवटी, त्यांना विजयाचा गौरव प्राप्त झाला.
परमेश्वराने हे आधीच पाहिले होते की त्यांची संतानं दु:ख भोगतील आणि सैतानाकडून येणाऱ्या अडथळ्यांचा सामना करतील. तरीही, शुद्धीकरणाद्वारे, त्यांनी प्रथम आपल्या संतानांना त्यांच्याबद्दल आदर, तसेच विश्वास, आशा, प्रेम आणि वाईटाचा त्याग करून चांगल्याचा शोध घेणारा आत्मा विकसित करण्यास मार्गदर्शन केले, आणि त्यानंतरच आपल्या सर्वशक्तिमान सामर्थ्याने त्यांच्यासाठी चमत्कार केले.
रुपे मुशीत व सोने भट्टीत तावून पाहतात, पण परमेश्वर हृदये पारखतो. नीतिसूत्रें १७:३
मी आरंभीच शेवट कळवतो. होणार्या गोष्टी घडवण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे, ‘माझा संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन.’ यशया ४६:१०
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण