जुन्या करारातील बेखमीर भाकरीचा सण ३,५०० वर्षांपूर्वी इस्राएल लोकांनी अनुभवलेल्या त्रासांची आठवण करुन देतो; वल्हांडण पाळल्यानंतर, ते दुसर्या दिवशी ते मिसरातून बाहेर आले आणि तांबड्या समुद्राला ओलांडेपर्यंत त्रासातून गेले.
हे त्या दु:खांच्या आणि बलिदानांच्या छायेच्या रुपात कार्य करत होते ज्यामधून येशू ख्रिस्त गेले होते; वल्हांडण पाळल्यानंतर, त्यांनी दु:ख सहन केले आणि दुसर्या दिवशी वधस्तंभावर खिळले गेले.
¡°आम्ही मरेपर्यंत तुमचे पालन करु¡± असा दावा करणाऱ्या शिष्यांकडून नाकारले जाणे आणि विश्वासघात करणे, अनेक विरोधकांकडून त्यांची थट्टा केली जाणे आणि उपहास केला जाणे, आणि शेवटी वधस्तंभावर खिळले जाणे— हे ते दु:ख आहे जे पवित्र आत्म्याच्या युगाचे तारणकर्ता ख्रिस्त आन सांग होंग जी यांनी २,००० वर्षांपूर्वी सहन केले होते.
आता ती वेळ आहे जेव्हा आपल्याला त्यांच्या प्रेमाची जाणीव करून देणार्या आणि स्वत:चा वधस्तंभ उचलू देणाऱ्या विश्वासाची गरज आहे.
मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःस नाकारावे व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.
कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपल्या जिवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरता आपल्या जिवाला मुकेल त्याला तो मिळेल.”
मत्तय १६:२४–२५
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण