जेव्हा आपण आपल्या विश्वासाच्या मार्गावर परीक्षा, यातना आणि वधस्तंभाच्या जड ओझ्याचा सामना करतो तेव्हा जे लोक या अडचणींना "मी दुर्दैवी आहे" असे समजतात ते खरोखर दुःखी होतील, पण जे या परिस्थितींमध्ये आशीर्वादाची जाणीव करतात आणि आभार मानतात त्यांना आनंद मिळेल आणि ते स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करतील.
ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर म्हणतात, "सर्वदा आनंदित असा आणि सर्व स्थितींत उपकारस्तुति करा" आणि आपल्याला समाधानी जीवन जगण्यास शिकवले कारण की जगीक इच्छा मोह आणि दुःख उत्पन्न करतात.
ते आपल्याला कोणत्याही दुर्दैवी परिस्थितीला आनंदी उर्जेमध्ये बदलण्याच्या द्वारे सुभक्तीची कसरत करण्याचा सराव करण्यास शिकवतात.
सर्वदा आनंदित असा; निरंतर प्रार्थना करा; सर्व स्थितींत उपकारस्तुती करा; कारण तुम्हांविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे.
थेस्सलनीकाकरांस पहिले पत्र ५:१६-१८
जो माणूस परीक्षेत ‘टिकतो तो धन्य,’ कारण आपणावर प्रीति करणार्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुगूट, परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल... तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो तेव्हा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते; आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते.
याकोबाचे पत्र १:१२-१५
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण