प्रत्येक व्यक्तिचे कार्य, ज्याची जीवनाच्या पुस्तकात नोंद आहे, हजारो वर्षानंतरही
मिटवले जात नाही, पण त्यांचा परमेश्वराद्वारे न्याय केला जातो
की ते पुरस्काराच्या योग्य आहेत का दंडाच्या. त्यानुसार,
ते नीतिमानांच्या पुनरुत्थानात भाग घेणार, जे त्यांना स्वर्गात घेऊन जातील, किंवा
अनीतिमानांच्या पुनरुत्थानात जे त्यांना नरकात घेऊन जातील.
प्रथम चर्चच्या संतांनी येशूच्या पुनरुत्थानाचा अनुभव घेतला आणि आपल्या विश्वासात दृढ राहिले.
आज, ख्रिस्त आन सांग होंग आणि स्वर्गीय माता आपल्याला पुनरुत्थान आणि रुपांतरावर
विश्वास करण्यास शिकवितात. ते शिकवितात की जेव्हा सर्व मनुष्य परमेश्वराचे भय बाळगतील
आणि आपल्या पापांबद्दल पूर्ण पश्चाताप करतील, तेव्हा त्यांचे आत्मिक देहामध्ये
रुपांतर होईल, आणि ते देवदूतांच्या जगामध्ये परत जातील.
आणि नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल,
अशी जी आशा ते धरतात तीच आशा मी देवाकडे पाहून धरितो.
ह्यामुळें देवासंबंधाने व माणसांसंबंधाने माझे मन सतत शुध्द
राखण्याचा मी यत्न करीत असतो.
प्रेषितांची कृत्यें 24:15-16
आपले नागतिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त
हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहो;
तो... तुमचे आमचे दैन्यावस्थेतील शरीर स्वत:च्या
गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रुपांतर करील.
फिलीपैकरांस पत्र ३:२०-२१
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण