जुन्या करारामधील प्रथम फळाचा सण नवीन करारामध्ये पुनरुत्थानाचा दिवस आहे.
ही एक भविष्यवाणी आहे जी रविवारी पूर्ण व्हावयाची होती.
आठवड्याच्या पहिल्या दिवशी इस्त्राएल लोक मिसरमधून निघून लाल समुद्र पार करुन गेले.
परमेश्वराने या दिवसाला प्रथम फळाच्या सणाच्या रुपात नेमिला,
आणि इस्त्राएल लोकांना हा दरवर्षी शब्बाथाच्या पुढच्या दिवशी (रविवारी) पाळू दिला.
प्रथम फळाच्या दिवसाच्या भविष्यवाणीला पूर्ण करुन,
आठवड्याच्या पहिल्या दिवशी (रविवारी) येशूचे पुनरुत्थान झाले होते.
पुनरुत्थान दिवसाचा आरंभ आणि खरा अर्थ शिकविला आहे.
जेव्हां पिकाच्या पहिल्या उपजाची पेंढी परमेश्वराला अर्पण केली जात असे, या प्रथम फळाच्या दिवसाच्या भविष्यवाणी नुसार, येशू प्रथम फळाच्या रुपात त्या लोकांमधून जे झोपी गेले होते, पुन्हा उठले आणि त्यांनी सर्व मनुष्यजातीला पुनरुत्थानाची आशा दिली. याच विश्वासासोबत चर्च ऑफ गॉड दरवर्षी पुनरुत्थानाचा दिवस पाळत आहे.
परमेश्वर मोशेला म्हणाला, “…आपल्या पिकाच्या पहिल्या उपजाची पेंढी तुम्ही याजकाकडे आणावी. ती पेंढी तुमच्यासाठी स्वीकारण्यात यावी म्हणून त्यानें परमेश्वरासमोर ती ओवाळावी; शब्बाथाच्या पुढच्या दिवशी याजकानें ती ओवाळावी.”
लेवीय २३:९-११
मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस, आपण तयार केलेली
सुगंधी द्रव्यें घेऊन त्या कबरेजवळ आल्या, तों कबरेवरुन धोंड लोटलेली आहे
असे त्यांना आढळले. त्या आत गेल्यावर त्यांना [प्रभू येशूचे] शरीर सापडले नाही...
तुम्हीं जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करितां?तो येथे नाही, तर उठला आहे;
तो गालीलांत होता तेव्हांच तुम्हांला काय सांगितले ह्याची आठवण करा.
लूक २४:१
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण