येशूने श्रीमंत मनुष्य आणि लाजरच्या दाखल्याद्वारे मनुष्यजातीला शिकवले की या पृथ्वीवर जीवनाचा अंत नाही. जरी लाजर पृथ्वीवर गरीब होता, पण तो स्वर्गाच्या आशेने एका प्रवाश्याच्या रुपात जगला आणि शेवटी त्याला आनंद मिळाला.
दुसरीकडे, श्रीमंत मनुष्य विलासाचे जीवन जगत होता, पण तो एका भटक्याप्रमाणे जगत होता.
तो स्वर्गाच्या राज्याची तयारी करण्यात अपयशी ठरला आणि शेवटी त्याला नरकात दु:ख सहन करावे लागले.
ख्रिस्त आन सांग होंग जी आणि माता परमेश्वर यांनी मानवजातीला अब्राहाम आणि मोशे सारख्या विश्वासाच्या पूर्वजांची साक्ष दिली ज्यांनी म्हटले, “आम्ही या पृथ्वीवर परके आणि प्रवासी आहोत.”
बायबलमधील या नोंदींच्य माध्यमातून, त्यांनी सर्व मनुष्यजातीला प्रबोधन केले की त्यांचे खरे घर जेथे त्यांना परत गेले पाहिजे ते स्वर्गाचे राज्य आहे.
हे सर्व जण विश्वासात टिकून मेले; त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली व तिला वंदन केले आणि आपण ‘पृथ्वीवर परके व प्रवासी’ आहोत असे पत्करले.
इब्री लोकांस पत्र ११:१३
“तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ नये; देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा.
माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत; . . . मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. . . .
जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.”
योहान १४:१–३
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण