येशूने स्वतः उपदेशाद्वारे मानवजातीला पापापासून वाचवण्याचा आदर्श ठेवला. त्यांनी आपल्याला “जगाला वाचवा” असे सांगून नव्या कराराचे कार्यकर्ते होण्याचे कार्य दिले. म्हणून, आपण एसावासारखे होऊ नये, ज्याने फक्त त्याला जे हवे होते तेच केले, तर याकोबासारखे झाले पाहिजे, ज्याने जे करायला हवे होते ते प्रथम केले. तेव्हाच आपण परमेश्वराने दिलेले आशीर्वाद प्राप्त करू शकतो.
जे आपले कर्तव्य करतात आणि जे करत नाहीत, त्यांच्यासाठी परिणाम म्हणजे स्वर्गाचे राज्य आणि नरक यांतील फरक आहे. ज्याप्रमाणे पवित्र आत्म्याचे आश्चर्यकारक कार्य नेहमी येशूप्रमाणे प्रचाराचे जीवन जगणाऱ्या प्रेषितांसोबत होते, त्याचप्रमाणे आता ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांच्या तारणाची घोषणा करणे हे आपले कर्तव्य आहे.
त्यानेच आम्हांला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले; तो करार लेखी नव्हे, तर आध्यात्मिक आहे; कारण लेख जिवे मारतो, परंतु आत्मा जिवंत करतो. करिंथकरांस दुसरे पत्र ३:६
तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मला आसपासच्या गावांत उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ; कारण ह्याच उद्देशाने मी निघालो आहे.” मार्क १:३८
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण