मोशेच्या काळात, परमेश्वराने त्या इस्त्राएल लोकांना नाशापासून वाचवले ज्यांनी वल्हांडण पाळला आणि त्या सर्व मिसरातील परिवारांना दंड दिला ज्यांनी वल्हांडण पाळला नाही. हे आपल्याला दाखविते की आपण कसे ह्या युगामध्ये देखील नाशापासून वाचविले जाऊ शकतो आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करु शकतो.
नवीन कराराचा वल्हांडण तो दिवस आहे जेव्हां मनुष्यजाती परमेश्वराच्या मांस व रक्ताला वारसाने प्राप्त करते आणि परमेश्वराच्या संतानांच्या रुपात शिक्का मिळविते आणि हा तो दिवस आहे जेव्हां त्यांना स्वर्गामध्ये केलेल्या त्यांच्या सर्व पापांपासून क्षमा केले जाते आणि ते सार्वकालिक जीवन प्राप्त करतात.
हेच कारण आहे की परमेश्वर संपूर्ण जगामध्ये वल्हांडण पाळला जाण्याची आणि त्यांच्या तारणप्राप्तीची उत्कट इच्छा ठेवून पवित्र कॅलेंडर प्रमाणे दुसर्या महिन्याच्या १४ व्या दिवशी वल्हांडण पाळण्याची आणखी एक संधी देतात.
इस्त्राएल लोकांना सांग की...त्याने परमेश्वराप्रीत्यर्थ सण पाळावा. दुसर्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी त्यांनी सण पाळावा; त्यांनी बेखमीर भाकर आणि कडू भाजी ह्यांच्याबरोबर वल्हांडणाचा यज्ञपशु खावा... परंतु एखादा मनुष्य शुध्द असून व प्रवासांत नसूनहि त्यानें वल्हांडण सण पाळण्याची हयगय केली तर त्याचा स्वजनांतून उच्छेद व्हावा.नेमिलेल्या समयी त्यानें परमेश्वराला अर्पण आणिलें नाही म्हणून त्याच्या पापाची शिक्षा त्याने भोगावी.
गणना ९:१०-१३
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण