उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये, जिथे हवामान फारसे बदलत नाही, तेथील झाडांना स्पष्ट वाढीची वलये नसतात, तर हवामानातील बदल, कीड, दुष्काळ आणि पुराचा सामना केलेल्या झाडांना स्पष्ट वाढीची वलये असतात. त्याचप्रमाणे, स्वर्गाच्या राज्यासाठी आपण कोणत्या प्रकारचे जीवन जगले आहे हे ठरवण्यासाठी, प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःच्या वाढीची वलये असतात. म्हणून, एका आत्म्याला वाचवण्यासाठी परमेश्वराच्या इच्छेला प्रामाणिक अंतःकरणाने आचरणात आणणे महत्त्वाचे आहे.
दररोज, प्रत्येक व्यक्ती घरी किंवा मंडळीत स्वर्गीय वाढीची वलये घडवत आहे. आपण ज्या मनोवृत्तीने सुवार्तेचा प्रचार करण्यात, उपासनेत सहभागी होण्यात आणि प्रार्थना करण्यात वेळ घालवतो, ती आपली स्वर्गीय वाढीची वलये ठरवते. प्रत्येक व्यक्तीला त्यानुसार आशीर्वाद आणि प्रतिफळ दिले जातील.
“ ‘पाहा, मी’ लवकर ‘येतो;’ आणि प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे.’ प्रकटीकरण २२:१२
जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावा-पासून नाशाचे पीक मिळेल; आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. गलतीकरांस ६:८–९
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण