परमेश्वराने पवित्र दिनदर्शिकेनुसार सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवसाला रणशिंगे फुंकण्याचा सण म्हणून नियुक्त केले, यासाठी की आपण प्रायश्चित्ताच्या दिवसाचे स्मरण करावे, ज्या दिवशी त्याने मूर्तिपूजेत पडलेल्या इस्त्राएल लोकांच्या पापांची क्षमा केली आणि त्यांना दहा आज्ञांचा दुसरा संच दिला. शिवाय, ज्याप्रमाणे रणशिंगे फुंकण्याचा सण याला पश्चात्तापाचे आवाहन करण्यासाठी रणशिंगे फुंकली जात असत, त्याचप्रमाणे येशूनेही या पृथ्वीवर येऊन “पश्चात्ताप करा” असे म्हणत मानवजातीला पश्चात्ताप करण्याचे आवाहन केले.
जसे आपण उधळ्या पुत्राच्या दाखल्यात आणि निनवेतील १,२०,००० लोकांचे तारणाकडे मार्गदर्शन करणाऱ्या योनाच्या अहवालात पाहू शकतो, पश्चात्तापाच्या कार्यानंतर परमेश्वराकडून मोठे आशीर्वाद नेहमी तयार असतात. आजही, आपण जगाकडे लावलेल्या आपल्या डोळ्यांबद्दल आणि अंतःकरणाबद्दल योनासारखा पूर्ण पश्चात्ताप केला पाहिजे आणि संपूर्ण जगाला ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांच्याकडे परत येण्याचे आवाहन करणारे रणशिंग फुंकले पाहिजे.
“इस्राएल लोकांना सांग: सातव्या महिन्याची प्रतिपदा तुम्हांला परमविश्रामाची असावी; स्मरण देण्यासाठी त्या दिवशी रणशिंगे फुंकावीत व पवित्र मेळा भरवावा.
प्रभू परमेश्वर म्हणतो, हे इस्राएल घराण्या, ह्यास्तव मी तुम्हा प्रत्येकाचा ज्याच्या त्याच्या मार्गाप्रमाणे न्याय करीन. तुम्ही परता, आपल्या सर्व पातकांपासून मागे फिरा, म्हणजे तुमचा अधर्म तुम्हांला अडथळा होणार नाही.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण