जर आपण परमेश्वराच्या अभिवचनांचे उल्लंघन केले आणि पवित्रता आणि भक्तीपासून दूर गेलो, तर आपण न्यायाच्या अधीन होऊ. नोहाच्या वेळी, सदोम आणि गमोरामध्ये आणि या शेवटल्या युगामध्ये, जगावर परमेश्वराच्या न्यायाच्या मागे एक समान धागा आहे: लोकांनी परमेश्वराला सोडले आणि बंडखोर, दुष्ट आणि व्यभिचारी बनले.
आज नोहाप्रमाणे, आपण न पाहिलेल्या गोष्टींवर दृढ विश्वास ठेवला पाहिजे. परमेश्वर दुष्ट जगाचा न्याय अग्नीने करतील या बायबलच्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवून, चर्च ऑफ गॉड नवीन कराराच्या वल्हांडण सणाचा प्रचार करते, ज्यामध्ये जगाला आपत्तींपासून वाचवण्याचे परमेश्वराचे अभिवचन आहे.
त्याच्या योगें तेव्हांच्या जगाचा पाण्यानें बुडून नाश झाला; पण आतांचें आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दानें अग्नीसाठीं राखलेलीं आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याचा व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेलीं आहेत. २ पेत्र ३:६–७
. . . हा परमेश्वराचा वल्हांडण सण होय. आणि ज्या घरांत तुम्ही असाल त्या घरांत तें रक्त तुमच्याकरितां खूण असें होईल. रक्त पाहीन तेव्हां मी तुम्हांला ओलांडून जाईन; मिसर देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाहीं, तुमचा नाश व्हावयाचा नाहीं. निर्गम १२:११–१३
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण