इस्राएल लोकांनी सोन्याच्या वासराची उपासना केल्यामुळे, मोशेला मिळालेल्या पहिल्या दहा आज्ञांना तोडण्यात आले.
इस्राएल लोकांना आपल्या पापांची जाणीव झाल्यानंतर आणि पश्चात्ताप केल्यानंतर, मोशे दुसर्या दहा आज्ञांसह खाली आला
ज्या परमेश्वराने त्यांना क्षमेच्या चिन्हाच्या रुपात दिल्या होत्या.
हे प्रायश्चित्ताच्या दिवसाचे मूळ बनले.
जेव्हां एखादी व्यक्ती पाप करते, तेव्हां ते पाप प्रायश्चित्ताच्या दिवसापर्यंत तात्पुरत्या स्वरुपात परमेश्वर,
म्हणजे पवित्रस्थानाकडे हस्तांतरित केले जाते.
प्रमुख याजकाने परमपवित्रस्थानामध्ये प्रवेश केल्यानंतर आणि रक्त शिंपडण्याचा विधी पार पाडल्यानंतर, पाप पूर्णपणे क्षमा होतात.
त्याचप्रमाणे, आज, यरुशलेम, जे परमपवित्रस्थान आहे, म्हणजेच माता परमेश्वराची कृपा प्राप्त केल्याशिवाय,
कोणीही पापांची पूर्ण क्षमा किंवा तारण प्राप्त करु शकत नाही.
नंतर पवित्रस्थान, दर्शनमंडप आणि वेदी ह्यांच्यासाठी प्रायश्चित्त करण्याचे संपवल्यावर त्याने तो जिवंत बकरा सादर करावा.
अहरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकर्याच्या डोक्यावर ठेवून इस्राएल लोकांची सर्व दुष्कर्मे व अपराध ह्यांचा
म्हणजे त्यांच्या सर्व पापांचा अंगीकार करावा; व ती त्या बकर्याच्या डोक्यावर ठेवून
त्याला नेमलेल्या मनुष्याच्या हाती रानात पाठवून द्यावे.
तो बकरा त्यांच्या सर्व दुष्कर्मांचा भार घेऊन निर्जन प्रदेशात वाहून नेईल;
त्या मनुष्याने त्या बकर्याला रानात सोडून द्यावे.
लेवीय १६:२०–२२
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण