सर्व मानवजातीने जगावे या तीव्र इच्छेने, परमेश्वराने वल्हांडण पर्वाचे महान वचन स्थापित केले. वधस्तंभावर आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री, त्यांनी “तुम्ही वल्हांडण पर्व पाळलेच पाहिजे,” अशी आज्ञा देऊन आपली अंतिम इच्छा सांगितली.
वल्हांडण, जो पाळण्याची आज्ञा स्वतः परमेश्वराने आपल्याला दिली आहे, तो मानवी अधिकाराने कधीही रद्द केला जाऊ शकत नाही. ज्याप्रमाणे इजिप्तमध्ये दीर्घकाळ गुलामगिरी सहन करणारे इस्त्राएल लोक वल्हांडणाद्वारे मुक्त झाले, त्याचप्रमाणे मृत्यूच्या साखळदंडांनी जखडलेल्या सर्व मानवजातीसाठी वल्हांडण पर्वाचे सत्य हाच स्वातंत्र्याचा एकमेव मार्ग आहे.
नंतर ज्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू मारायचा तो बेखमीर भाकरीचा दिवस आला. नंतर वेळ झाली तेव्हा तो जेवायला बसला व त्याच्याबरोबर प्रेषितही बसले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मी दुःख भोगण्यापूर्वी हे वल्हांडणाचे भोजन तुमच्याबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती; लूक २२:७–१५
ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही; जो माझा देह खातो व माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. योहान ६:५३–५४
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण