ज्याप्रमाणे पारसाचा राजा कोरेश याने बायबलमधील स्वतःविषयीची भविष्यवाणी शोधून काढली आणि तो इतका प्रभावित झाला की त्याने इस्राएली लोकांना गुलामगिरीतून मुक्त केले व यरुशलेममध्ये मंदिर बांधले, त्याचप्रमाणे आपणही बायबलमध्ये नोंदवलेल्या भविष्यवाण्यांवर विश्वास ठेवला पाहिजे. कोरेशप्रमाणेच त्याच अथांग आनंदाने भरून, आपण आपल्या संपूर्ण हृदयाने आणि संपूर्ण आत्म्याने, परमेश्वराने आज्ञापिलेल्या सुवार्तेचा प्रचार केला पाहिजे.
येशूने दहा मिनांच्या दृष्टांताद्वारे शिकवल्याप्रमाणे, त्याने परमेश्वराच्या वचनाचे भय बाळगणाऱ्यांना एका गौरवशाली भविष्याचे वचन दिले आहे: ते परमेश्वराबरोबर युगानुयुग राज्य करतील आणि स्वर्गाच्या राज्यात अनंतकाळच्या गौरवाचा आनंद घेतील —हे असे ठिकाण आहे जिथे मृत्यू, शोक, रडणे किंवा दु:ख यांपैकी काहीही नसेल.
नंतर मी ‘नवे आकाश व नवी पृथ्वी’ ही पाहिली; पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. . . . ‘तो’ त्यांच्या डोळ्यांचे ‘सर्व अश्रू पुसून टाकील;’ ह्यापुढे मरण नाही; ‘शोक, रडणे’ व कष्ट हे नाहीत; कारण ‘पहिल्या गोष्टी’ होऊन गेल्या.” प्रकटीकरण २१:१–४
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण