नोहाने तारू बांधताना बराच काळ एकटेपणाला सामोरे जावे लागले तरीही त्याने परमेश्वराच्या आशीर्वादावर विश्वास ठेवला. मोशेने मिसरमध्ये एक राजकुमार म्हणून परमेश्वराच्या गौरवाचा आनंद उपभोगण्यापेक्षा त्याच्या लोकांसोबत दु:ख सहन करणे पसंत केले. प्रेषित पौलाने अनेक संकटांना सामोरे जाऊनही लोकांना स्वर्गाचे राज्य देण्याची संधी मिळाल्याने, आनंदीत झाला. त्याचप्रमाणे, चर्च ऑफ गॉडचे सदस्य आनंदाने आपला क्रूस उचलून विश्वासाच्या मार्गावर चालत आहेत.
स्वर्गीय माता आपल्याला नेहमी आठवण करून देतात, “आपल्याकडे स्वर्गाच्या राज्याची आशा नाही का?” म्हणून, मग ते संत असो किंवा पुरोहित कर्मचारी जे आघाडीवर काम करत आहेत, प्रत्येकाने आपले स्वत:चे क्रूस उचलताना आपल्या डोळ्यांसमोर येणाऱ्या अडथळ्यांच्या पलीकडे तयार केलेल्या स्वर्गाच्या राज्याच्या आशीर्वादांकडे पाहिले पाहिजे.
‘ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणें’ ही मिसर देशांतील धनसंचयापेक्षां अधिक मोठी संपत्ति आहे असें त्यानें गणिलें; कारण त्याची दृष्टि प्रतिफळावर होती. इब्री लोकांस पत्र ११:२६
कारण जर तुम्ही देहस्वभावाप्रमाणें जगलांत तर तुम्ही मरणार आहां; परंतु जर तुम्हीं आत्म्यानें शरीराचीं कर्में ठार मारलींत तर जगाल. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवीत आहे तितके देवाचे पुत्र आहेत; . . . आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावें म्हणून त्याच्याबरोबर जर दु:ख भोगित असलों तरच. कारण आपल्यासाठीं जे गौरव प्रगट होणार आहे त्याच्यापुढें सांप्रत काळाचीं दुःखें कांहींच नाहींत असें मी मानतों. रोमकरांस पत्र ८:१३–१८
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण