इस्राएल लोकांच्या निर्गमनाच्या वेळी, संपूर्ण मिसर देशावर आपत्ती कोसळल्या, पण इस्राएल लोकांवर कोणतीही आपत्ती आली नाही. परमेश्वराचा करार असलेले ठिकाण आणि तो नसलेले ठिकाण यांतील हाच नेमका फरक होता. परमेश्वराने एक मोठे अभिवचन दिले आहे की, जिथे कुठे त्यांची आज्ञा—नवीन कराराचा वल्हांडण—पाळली जाईल, तिथे त्यांचे लोक आत येताना व बाहेर जाताना आशीर्वादित होतील, आणि तो त्यांना पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा उंच करील.
यशया, सफन्या आणि पेत्र संदेष्टे साक्ष देतात की या पृथ्वीवर अग्नीची मोठी आपत्ती येईल, कारण जग नवीन कराराचे पालन करत नाही, ज्यात परमेश्वराचा शब्बाथ दिवस आणि वल्हांडण समाविष्ट आहे. बायबल साक्ष देते की, केवळ परमेश्वराच्या कराराचे पालन केल्यानेच मानवजात पिता ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांची संतान बनते व सर्व आपत्तींपासून परमेश्वराचे संरक्षण प्राप्त करते.
तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तूं लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतों त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षां तुला उच्च करील; तूं आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धांवत येतील. . . . तूं आंत येशील तेव्हां आशीर्वादित होशील व बाहेर जाशील तेव्हां आशीर्वादित होशील. अनुवाद २८:१–६
तू ह्या लोकांना ह्या सर्व गोष्टी सांगितल्या म्हणजे ते तुला विचारतील, ‘परमेश्वराने हे सर्व मोठे अरिष्ट आमच्यावर येईल असे का सांगितले? परमेश्वर आमचा देव ह्याच्याविरुद्ध आम्ही कोणता अपराध, कोणते पातक केले आहे?’ तेव्हा तू त्यांना सांग, ‘परमेश्वर म्हणतो, कारण हेच की तुमच्या पूर्वजांनी माझा त्याग केला, ते अन्य देवांच्या मागे लागले, त्यांनी त्यांची सेवा व भजन केले, त्यांनी मला सोडले, माझे नियमशास्त्र पाळले नाही. यिर्मया १६:१०–११
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण