जेव्हा परमेश्वराची मुले परमेश्वराच्या शिकवणीनुसार जगाचे मीठ आणि प्रकाश बनतील, आपल्या चांगल्या कृत्यांद्वारे परमेश्वराचे गौरव प्रदर्शित करतील, आणि नवीन कराराच्या सत्याने मानवजातीला परमेश्वराकडे घेऊन जातील, तेव्हा परमेश्वर संतुष्ट होतील आणि ज्या दिवशी ते त्यांच्यासमोर उभे राहतील त्या दिवशी त्यांना भरभरून आशीर्वाद देतील.
जर आपण पवित्र आत्म्याच्या युगामध्ये ख्रिस्त आन सांग होंग आणि यरुशलेम स्वर्गीय माता यांना स्वीकारले आहे, तर आतापासून, आपण जगातून शिकलेल्या वाईट सवयी सोडून दिल्या पाहिजेत आणि ख्रिस्ती म्हणून नवीन मनुष्यत्व धारण केले पाहिजे. जसजसे हे जग अधिकाधिक आपली सुभक्ती गमावत आहे आणि विकृत व दुष्ट बनत आहे, तसतसे आपण हे ओळखले पाहिजे की नोहा आणि लोट यांच्या दिवसांप्रमाणेच परमेश्वराच्या न्यायाचा दिवस जवळ आला आहे, आणि आपण अधिक सुभक्त जीवन जगले पाहिजे.
म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हांला विनवतो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या. रोमकरांस पत्र १२:१–२
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण